Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामाझ्यावर पवित्र भंडाऱ्याची उधळण झाल्याने मला आनंदच…; सोलापुरातील प्रकारावर विखे पाटलांची प्रतिक्रिया

माझ्यावर पवित्र भंडाऱ्याची उधळण झाल्याने मला आनंदच…; सोलापुरातील प्रकारावर विखे पाटलांची प्रतिक्रिया

सोलापूर | Solapur

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असतानाच आता इतर समाजांच्या आरक्षणांची मागणीही समोर येत आहे. दरम्यान, आज धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना रोषाला सामोरे जावे लागले. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देताना धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर भंडारा उधळला. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते. त्यात त्यांनी काही वावगं केलंय असं मला वाटत नाही. त्यानं अचाकन ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला. त्यांची ती जबाबदारीच आहे. तरी मी सूचना दिल्या आहेत की गुन्हा वगैरे दाखल करू नका. कोणतीही कारवाई करू नका, असं राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुष्कळ निर्णय झाले आहेत. संविधानात ज्या तरतूदी आहे, त्यावर खल सुरू आहेत. धनगर की धनगड यावर मार्ग काढला जात आहे. आरक्षण देण्याबाबत चर्चा आहे. पण त्यांना सर्व सवलती दिल्या आहेत. त्यांना वंचित ठेवलं नाही. नवीन महामंडळ तयार केलं आहे. 10 हजार कोटींचा आऊटलेट दिला आहे. 6 लाख कुटुंबांना शेळ्यामेंढ्यांचं क्लस्टर देणार आहोत. त्यात 75 टक्के अनुदान सरकार देणार आहे. मोठं पाऊल उचललं आहे. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर थांबलो नाही. त्यापलिकडे जाऊन काम सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या