Tuesday, March 25, 2025
Homeनगरराहाता शहरातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणवर हातोडा

राहाता शहरातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणवर हातोडा

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरातील कोपरगाव नाका (Kopargav Naka) परीसरात नगर मनमाड रोडच्या (Nagar Manmad Road) पश्चिमेकडील पत्र्याच्या शेडमध्ये असलेली अतिक्रमणे (Encroachment) बुधवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. सतत अपघातात कारणीभूत ठरत असलेले हे अतिक्रमण काढल्यामुळे शहराचा श्वास मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाला धन्यवाद दिले. राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राहाता शहरात अतिक्रमण (Encroachment) काढण्यास सुरुवात झाली. सकाळी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफिसर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, नायब तहसीलदार हेमंत पाटील यांचेसह पाच पोलीस उपनिरीक्षक, नव्वद पोलीस तसेच महसूल व नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या निगराणीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. अनेकांनी स्वतःहून महामार्गाच्या मध्य पासून 13 मीटर अंतरावर आखण्यात आलेल्या आतीलअतीक्रमणे काढून घेतली. यावेळी व्यावसायिक व अधिकारी यांच्यामध्ये तणावपूर्ण चर्चा झाली.

- Advertisement -

कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला कोपरगाव नाका येथील अतिक्रमण (Encroachment) सकाळी काढण्यास सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. काही ठिकाणी इमारतीला नोटीस चिटकवली होती. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम बाजूकडील ज्या व्यवसायिकांचे अतिक्रमण (Encroachment) काढण्यात येत आहे त्या व्यावसायिकांनी अधिकार्‍यांना समोरच्या पूर्वेकडील बाजूचे अतिक्रमण का काढले जात नाहीत? आमच्यामध्ये काही लोकांना नोटीस आल्या, काहींना नाही याबाबतचे म्हणणे अधिकार्‍यांना सांगितले. दुपारी एक वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाई सुरू होती.

राहाता शहरातील कोपरगाव नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या महामार्ग लगत गेल्या अनेक वर्षापासून पत्र्याचे शेड, कंपाउंड जाळी व अनाधिकृत बांधकामे यामुळे या परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघात हे नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी झाली होती. या ठिकाणी अपघात घडून अनेकांना प्राण गमावले लागले. बुधवारी राज्य महामार्ग प्राधिकरण विभागाने या परिसरातील अतिक्रमण काढल्यामुळे महामार्ग मोकळा झाला. उर्वरित असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...