पिंपरी निर्मळ (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड मृत्युमुखी पडली आहे. बिबट्याने गावठाणमध्ये राहणार्या वस्तीवर हल्ला केल्याने बिबट्या आता थेट गावात घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
पिंपरी निर्मळ येथील राहता, शिर्डी बाह्य वळण लगतच्या खळवाडीमध्ये राहणार्या सोमनाथ वसंत निर्मळ यांच्या शेडमधील कालवडीवर बिबट्याने शुक्रवारी रात्री हल्ला केला. यामध्ये कालवण मृत्युमुखी पडली आहे.
विशेष म्हणजे सोमनाथ निर्मळ हे बायपास लगतच्या गावठाण भागातील खळवाडीमध्ये राहतात. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी घरे आहेत.
हे हि वाचा : आवक थांबली, गोदावरीतील विसर्ग बंद! जायकवाडीच्या दिशेने वाहिले 17.8 टिएमसी पाणी
बिबट्याने थेट गावात येत खळवाडी मधील पशुधनावर हल्ला केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान वनविभागाचे अधिकारी प्रतीक गजेवार व पशुधन अधिकारी डॉ. भालेराव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.
बिबट्याच्या या हल्ल्यात कालवडीच्या मृत्यूमुळे सोमनाथ निर्मळ यांचे जवळपास 40 हजाराचे नुकसान झाले आहेत. पिंपरी निर्मळ गावात बहुतांश वस्त्यांवर दररोज बिबट्या दिसत आहे. परिसरात बिबट्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
हे हि वाचा : बिबट्याने डॉबरमन कुत्र्याचा पाडला फडशा