Tuesday, February 3, 2026
HomeनगरRahata Market Rate : राहाता बाजार समितीत डाळिंब, सोयाबीन, मक्याला किती भाव...

Rahata Market Rate : राहाता बाजार समितीत डाळिंब, सोयाबीन, मक्याला किती भाव मिळाला?

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला प्रती किलो सर्वाधिक 205 रुपये एवढा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

- Advertisement -

सोमवारी बाजार समितीत एकूण 606 क्रेट्स डाळिंबाची आवक झाली. डाळिंब नंबर 1 या दर्जाच्या फळांना 141 ते 205 रुपये दरम्यान भाव मिळाला, तर नंबर 2 डाळिंबासाठी 91 ते 140 रुपये, नंबर 3 साठी 51 ते 90 रुपये, आणि नंबर 4 साठी 10 ते 50 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाल्याची नोंद झाली.

YouTube video player

डाळिंबाबरोबरच इतर कृषी उत्पादनांच्या दरातही थोडाफार चढ-उतार पाहायला मिळाला. सोयाबीनची 2 क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल 4221 रुपये एवढा सरासरी दर मिळाला. गव्हाची 1 क्विंटल आवक झाली असून त्याला 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला.

दरम्यान, मक्याची 40 क्विंटल आवक नोंदवली गेली. मक्याला किमान 1400 रुपये ते कमाल 1571 रुपये असा दर मिळाला. एकूण सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सीताफळाच्या 923 क्रेट्स बाजारात दाखल झाल्या. सीताफळाला 10 ते 27 रुपये किलो असा दर मिळून सरासरी भाव 18 रुपये किलो राहिला. तसेच बोराच्या 39 क्रेट्स ची आवक झाली असून त्याला सरासरी 25 रुपये किलो एवढा दर मिळाला.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...