Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील गवार, टोमॅटो, अद्रकचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील गवार, टोमॅटो, अद्रकचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. गवार 6500 रुपये, टोमॅटो 7500 रुपये तर अद्रकाला 16500 रुपये भाव मिळाला,अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

- Advertisement -

राहता बाजार समितीत लिंबू सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. आद्रक किमान 13000 रुपये, जास्तीत जास्त 16000 रुपये, सरासरी 14500 रुपये, बटाटा किमान 1500 रुपये, जास्तीत जास्त 1600 रुपये तर सरासरी 1550 रुपये. बीट सरासरी 2000 रुपये. भेंडी सरासरी 3000 रुपये. दुधी भोपळा 800 ते 1000 रुपये, सरासरी 900 रुपये. चवळी शेंगा सरासरी 2500 रुपये. फ्लॉवर 1000 ते 1500 रुपये, सरासरी 1200 रुपये. गाजर सरासरी 2000 रुपये. गवार 6500 रुपये क्विंटल. घेवडा सरासरी 5000 रुपये. काकडी 500 ते 1000 रुपये, सरासरी 800 रुपये. कारली 3000 ते 4500 रुपये, सरासरी 3700 रुपये. कोबी 800 ते 1000 रुपये, सरासरी 900 रुपये. लसूण 10000 ते 13000 रुपये, सरासरी 12000 रुपये.

ढोबळी मिरची 1000 ते 4000 रुपये, सरासरी 2500 रुपये. शेवगा 2000 ते 4000 रुपये, सरासरी 3000 रुपये. दोडका शिराळी 5000 ते 6000 रुपये, सरासरी 5500 रुपये. टोमॅटो 2000 ते 7500 रुपये, सरासरी 4700 रुपये. वालवड सरासरी 3000 रुपये. वांगी 2000 ते 2500 रुपये, सरासरी 2200 रुपये. पिकेडोर 2000 ते 3000 रुपये, सरासरी 2500 रुपये. मिरची हिरवी 2000 ते 2500 रुपये, सरासरी 2200 रुपये.

कोथिंबीर नग 2 ते 4 रुपये, सरासरी 3 रुपये. मेथी भाजी 5 ते 7 रुपये, सरासरी 6 रुपये. पालक 3 ते 5 रुपये, सरासरी 4 रुपये. शेपू सरासरी 8 रुपये, असा भाव मिळाला.

सोयाबीनला राहाता बाजार समितीमध्ये 4879 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2674 रुपये जास्तीत जास्त 2691 रुपये तर सरासरी 2682 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या