Friday, November 22, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीला कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी 11 कोटी - ना. सत्तार

राहाता बाजार समितीला कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी 11 कोटी – ना. सत्तार

फूल निर्यात केंद्र सुरू करणार- ना. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता परिसरात डाळिंब व फुलांचे चांगले मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकर्‍यांचा शेतमाल सुरक्षित राहावा यासाठी राहाता बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी 11 कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणा पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्याबरोबर आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, अशा शब्दांत श्री. सत्तार यांनी शेतकर्‍यांना आश्वस्त केले.
राहाता बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.

- Advertisement -

याप्रसंगी अण्णासाहेब म्हस्के, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, तुकाराम बेंद्रे, बापूसाहेब आहेर, भाऊसाहेब जेजुरकर, मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सोपानराव सदाफळ, कैलास सदाफळ, कैलास बापू कोते, रावसाहेब देशमुख, वाल्मिक गोर्डे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, प्रा. भानुदास बेरड, रंगनाथ मते, बाळासाहेब डांगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक रोहोम, नंदू राठी, सतिश बावके, जालिंदर तुरकणे, रेवणनाथ दंडवते, किरण दंडवते, सुनील गमे, अस्तगावच्या सरपंच सविता चोळके, बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे, उद्धव देवकर, उपनिबंधक गणेश पुरी, सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते.

ना. सत्तार म्हणाले, राहाता बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी 11 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. यात 6 कोटींचे अनुदान असणार आहे. याच ठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. या शेतकरी भवनाच्या भूमिपुजनासाठी मी स्वतः उपस्थित राहील. असेही त्यांनी सांगितले. कृषीमंत्री असताना सावळीविहीर येथील कृषी विभागाची 75 एकर जमीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली. याची आठवणही श्री. सत्तार यांनी यावेळी काढली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आगामी काळात शिर्डी एमआयडीसीत 1 हजार कोटींची गुंतवणूक होऊन 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. परिसरातील शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव, कालवे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काळात बाजार समितीत निर्यात सुविधा केंद्रामुळे फूल उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. राहाता बाजार समितीची उलाढाल 540 कोटींची आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना तालुक्यात 2 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. अतिशय पारदर्शक कारभार केला आहे. देशभरातील शेतमालाचे भाव राहाता बाजार समितीत पाहता येतात. असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी प्रास्ताविक केले. आभार संतोष गोर्डे यांनी मानले. याप्रसंगी संचालक बाबासाहेब शिरसाठ, विजयराव कातोरे, दत्तात्रय गोरे, दिलीप गाडेकर, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, संतोष गोर्डे, शांताराम जपे, सुभाष गायकवाड, राजेंद्र धुमसे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर, रंजना लहारे, मिनाताई निर्मळ, बापूसाहेब लहारे, भीमराज निर्मळ, मधुकर कोते, दिगंबर कोते, गोपीनाथ गोंदकर, राजेंद्र तांबे, अशोक आगलावे, बाळासाहेब गमे, सचिन मुरादे, आदींसह शेतकरी, व्यापारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहाता बाजार समितीत वजनात मारले जात नाही. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांंना बाजार समितीत प्रवेश नाही. कारभार पारदर्शक, येथे खुले कांदा मार्केट राज्यात पहिले आहे. वार्षिक उलाढाल 500 कोटींच्या पुढे आहे. या बाजार समितीला आपण राज्यात प्रथम क्रमांकाची बनविणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. या बाजार समितीच्या उभारणीत सुरुवातीला गणेशचे माजी अध्यक्ष कै. भानुदास दंडवते यांनीही मदत केल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. राजकिय मतभेद काहीही असो त्यांनी मदत केली.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या