Tuesday, October 22, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 5000 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 1836 गोण्यांची आवक सुरु झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 4200 रुपये ते 5000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3200 रुपये ते 4150 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2200 रुपये ते 3150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 3400 रुपये ते 3800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 1500 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या (Pomegranate) 2818 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 131 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 रुपये ते 40 रुपये भाव मिळाला. सिताफळाची 300 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिकिलोला 10 ते 55 रुपये तर सरासरी 40 रुपये. पेरुच्या 194 क्रेटसची आवक झाली.

पेरुला (Guava) किमान 5 ते 27 रुपये प्रतिकिलो, सरासरी 17 रुपये. संत्रीची 18 क्रेटसची आवक झाली. संत्रीला किमान 10 रुपये ते 25 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या