राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 2200 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 19,419 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1750 रुपये ते 2200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1300 ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 700 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 800 रुपये ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 400 रुपये ते 700 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 5881 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 220 रुपये ते 305 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 130 रुपये ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 60 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला. पेरूच्या 72 क्रेट्सची आवक झाली. प्रतिकिलोला पेरूला 5 ते 27 रुपये, तर सरासरी 15 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




