राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 2000 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 12097 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1700 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 रुपये ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 750 रुपये ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 800 रुपये ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 400 रुपये ते 700 रुपये भाव मिळाला.
डाळींबाच्या (Pomegranate) 9741 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 211 रुपये ते 305 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 121 रुपये ते 210 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 51 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला.
पेरुच्या 298 के्रटसची आवक झाली. पेरुला 7.50 रुपये ते 20.50 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 17.50 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फु्रटची 15 क्रेटसची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला 55 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 70 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




