राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी गोणीतील कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2200 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 7410 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1600 रुपये ते 2200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1550 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 250 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 529 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 141 रुपये ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 140 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 24 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4350 रुपये, जास्तीत जास्त 4400 रुपये, तर सरासरी 4375 रुपये भाव मिळाला.
मकाला सरासरी 1275 रुपये भाव मिळाला. हरभर्याला सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. ज्वारीची 14 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला किमान 1900 रुपये, जास्तीत जास्त 2511 रुपये, तर सरासरी 2205 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 991 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला प्रतिकिलोला 3 ते 30 रुपये, तर सरासरी 16 रुपये भाव मिळाला. पेरूची 74 क्रेट्सची आवक झाली. पेरूला 5 ते 19 रुपये, तर सरासरी 12 रुपये भाव मिळाला.




