राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 2400 रुपये भाव मिळाला. कांद्याची मंगळवारी राहता बाजार समिती 3892 गोण्यांची ची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1800 ते 2400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 1100 ते 1750 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 600 ते 1300 रुपये. जोड कांदा (Onion) 250 ते 500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
संत्रीच्या (Oranges) 6 क्रेट्सची आवक झाली. संत्र्याला 5 ते 20 रुपये तर सरासरी 10 रुपये भाव मिळाला. पेरुच्या 3 क्रेटस ची आवक झाली. पेरूला सरासरी 15 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. बाजार समितीत गव्हाची 10 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 2887 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 7 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 5150 ते 5200 रुपये तर सरासरी 5175 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6300 रुपये भाव मिळाला.




