राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्यासह इतर शेतीमालाचे लिलाव उत्साहात पार पडले. यामध्ये कांद्याला (Onion) प्रति क्विंटल 1850 रुपयांपर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला असून, बाजार समितीत कांद्याची एकूण 4256 गोण्यांची आवक नोंदवली गेली.
बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याचे प्रतवारीनुसार दर पुढीलप्रमाणे राहिले: नंबर एकचा कांदा 1400 ते 1850 रुपये, नंबर दोन 900 ते 1350 रुपये, तर नंबर तीनच्या कांद्याला (Onion) 400 ते 850 रुपये दर मिळाला. याशिवाय गोल्टी कांदा (Onion) 500 ते 1100 रुपये आणि जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलने विकला गेला.
कांद्याव्यतिरिक्त सोयाबीनची (Soybeans) 11 क्विंटल आवक झाली असून त्यास 5300 ते 5400 रुपये सरासरी 5350 भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2766 रुपये, मक्याला सरासरी 1651 रुपये आणि तुरीला 7299 रुपये सरासरी दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.




