Friday, April 25, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 6000 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) आवक वाढली आहे. मंगळवारी कांद्याच्या एकूण 5934 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4900 ते 6000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3800 रुपये ते 4850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2200 रुपये ते 3750 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 3800 रुपये ते 4200 रुपये. जोड कांदा 1200 ते 1500 रुपये प्रमाणे विकला.

- Advertisement -

सोयाबीनची 20 क्विटंलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 3991 रुपये, जास्तीत जास्त 4082 रुपये तर सरासरी 4040 रुपये. ज्वारी 1900 ते 2200 रुपये तर सरासरी 2050 रुपये. गव्हाला सरासरी 3100 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 110 क्रेटसची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 250 ते 5500 रुपये तर सरासरी 4000 रुपये. पेरुच्या 168 क्रेटसची आवक झाली. पेरुला (Guava) 250 ते 1350 रुपये तर सरासरी 500 रुपये भाव मिळाला. पपईच्या 62 क्रेटसची आवक झाली. पपईला 250 ते 600 तर सरासरी 500 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या 67 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किमान 86 रुपये तर जास्तीत जास्त 137 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 46 रुपये तर जास्तीत जास्त 85 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला किमान 26 ते जास्तीत जास्त 45 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 25 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...