Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 1700 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 8040 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1300 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 800 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 150 ते 300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 2036 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 171 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 148 क्रेट्सची आवक झाली. प्रतिकिलोला पेरूला 5 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. संत्रीची 7 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 25 रुपये तर सरासरी 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

YouTube video player

गव्हाची 37 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2400 रुपये, जास्तीत जास्त 2660 रुपये तर सरासरी 2550 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 15 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3701 ते 4001 रुपये तर सरासरी 3851 रुपये भाव मिळाला. मुगाला सरासरी 6250 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1842 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 662 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 5 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या