Friday, May 16, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) चांगला भाव मिळाला. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 6200 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) आवक वाढली आहे. कांद्याच्या एकूण 2490 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4800 ते 6200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3700 रुपये ते 4750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2200 रुपये ते 3650 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 3600 रुपये ते 4100 रुपये. जोड कांदा 1200 ते 1700 रुपये.

सिताफळाच्या 771 कॅरेटची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 500 ते 4500 रुपये तर सरासरी 3000 रुपये. पेरुच्या (Guava) 598 क्रेटसची आवक झाली. पेरुला (Guava) 500 ते 1800 रुपये तर सरासरी 1000 रुपये भाव मिळाला. पपईच्या 36 क्रेटसची आवक झाली. पपईला सरासरी 1000 रुपये भाव मिळाला. बोराची 8 क्रेटसची आवक झाली. बोराला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. ड्रँगन फ्रुट 8000 ते 10000 रुपये ते 9000 प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 453 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किमान 76 रुपये तर जास्तीत जास्त 150 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 51 रुपये तर जास्तीत जास्त 75 रुपये. डाळींब नंबर 3 ला किमान 21 ते जास्तीत जास्त 50 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 20 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वानखेडे

Wankhede Standium Stand: वानखेडे स्टेडीयमच्या स्टँड्सला रोहित शर्माचे, शरद पवार, अजित...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाने खास स्टँड उभारण्यात...