Thursday, January 8, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी तुरीला (Pigeon Pea) जास्तीत जास्त 6100 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 9 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला 4082 रुपये ते 4100 रुपये तर सरासरी 4091 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2245 रुपये भाव मिळाला. तुरीला (Pigeon Pea) सरासरी 6100 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 16 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 1500 रुपये, जास्तीत जास्त 5500 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला. संत्रीला सरासरी 750 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कोल्हार उपशाखेत गव्हाला किमान 2985, जास्तीत जास्त 3425 रुपये तर सरासरी 3205 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) 4071 ते 4095 रुपये तर सरासरी 4080 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2231 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...