राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलो सर्वाधिक 255 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1966 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 171 ते 255 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 170 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 56 ते 110 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रति किलो भाव मिळाले.
ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 11 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला किमान 20 रुपये, जास्तीत जास्त 35 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाले. सीताफळाची 259 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 5 ते 40 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाले. संत्रीची 66 कॅरेटची आवक झाली. संत्रीला 5 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रति किलो भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




