राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी डाळिंबाला प्रति किलो 380 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 10,178 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 211 ते 380 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 56 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रति किलो भाव मिळाला.
कांद्याच्या (Onion) 13,160 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1,400 ते 1,700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1,000 ते 1,350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 रुपये ते 950 रुपये, जोड कांद्याला (Onion) 250 ते 500 रुपये भाव मिळाला.
पेरूच्या (Guava) 47 कॅरेटची आवक झाली. पेरूला सरासरी प्रति किलो 21 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) 23 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला 40 ते 70 रुपये, तर सरासरी 55 रुपये प्रति किलो भाव मिळाला. संत्रीच्या 55 कॅरेटची आवक झाली. संत्रीला 5 ते 22.50 रुपये, तर सरासरी 7.50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सुभाष मोटे यांनी दिली.





