Wednesday, December 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळींबाला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळींबाला (Pomegranate) प्रतिकिलोला जास्तीत जास्त 255 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 2268 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 91 रुपये ते 255 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 61 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 31 रुपये ते 60 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 30 रुपये भाव मिळाला. सिताफळाची 248 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला 500 ते 3500 रुपये तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.

कोल्हार उपबाजारात सोयाबीन 4250 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक उपबाजारात बुधवारी सोयाबीनची (Soybeans) 42 क्विंटल आवक झाली. सोयाबीन कमीतकमी 3726 रुपये तर जास्तीत जास्त 4250 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. सोयाबीन (Soybeans) सरासरी 4150 रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात आली.

तसेच उपबजारात गव्हाची 8 क्विंटल आवक झाली. गहू कमीत कमी 2700 रुपये तर जास्तीत जास्त 3100 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. गहू सरासरी 2900 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. ज्वारीची 1 क्विंटल आवक झाली. ज्वारी सरासरी 2081 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या