Wednesday, May 20, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रतीकिलोला सर्वाधिक 130 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 16 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 130 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 26 ते 60 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

पेरूची (Guava) 16 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) किलोला कमीत कमी 5 रुपये, जास्तीत जास्त 32 रुपये प्रतिकिलो तर सरासरी 27 रुपये किलो भाव मिळाला. गव्हाची 26 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2050 रुपये, जास्तीत जास्त 2421 रुपये तर सरासरी 2235 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 5300 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1800 रुपये, हरभरा 7 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला किमान 5250 रुपये, जास्तीत जास्त 5276 रुपये तर सरासरी 5265 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...