राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक 255 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 424 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 ते 255 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 170 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 110 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.
पेरूच्या 190 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 5 ते 13 रुपये तर सरासरी 9 रुपये प्रति किलो भाव मिळाला. मोसंबीच्या 58 कॅरेटची आवक झाली. मोसंबीला 5 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 967 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 8 ते 40 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला.
बोराच्या 44 कॅरेटची आवक झाली. बोराला प्रति किलो 8 ते 20 रुपये तर सरासरी 12 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.





