Wednesday, March 26, 2025
Homeनगरराहाता पंचायत समिती सभापती पद प्रवरेला मिळण्याची शक्यता

राहाता पंचायत समिती सभापती पद प्रवरेला मिळण्याची शक्यता

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिला या जागेसाठी निघाल्याने राहात्याच्या विद्यमान सभापती हिराबाई कातोरे यांना पुन्हा संधी मिळते की, दाढ गणातील नंदाबाई तांबे यांची वर्णी लागते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

राहाता पंचायत समितीत 10 सदस्य असून यात पाच महिला तर पाच पुरूष सदस्य आहे. मागील वेळीही सर्वसाधारण महिला या जागेसाठीच सभापती पद आरक्षीत होते. यावेळीही हे पद याच जागेसाठी आरक्षीत निघाले असून गेल्यावेळी साकुरी गणातून निवडून आलेल्या हिराबाई भाऊसाहेब कातोरे यांना संधी मिळाली होती. तर उपसभापती बबलू म्हस्के यांना देण्यात आले होते. दरवेळी गणेश परिसराला सभापती पद मिळाले तर प्रवरा परिसराला उपसभापती पद दिले जाते. त्यामुळे यावेळी प्रवरा परीसराला सभापती पद मिळू शकते.त्यात दाढ गणातून निवडून आलेल्या नंदाबाई गोरक्षणाथ तांबे यांची लॉटरी लागू शकते तर उपसभापती पद गणेश परिसराला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सर्वसाधारण महिलासाठी दोनच महिला उमेदवार असल्याने त्यात एकीस संधी मिळाल्याने गणित सोपे झाले असले तरी उपसभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पंचायत समितीवर माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे निर्वीवाद वर्चस्व असल्याने विखे ठरवतील तोच सभापती व उपसभापती पदी निवड होईल. प्रत्येक सदस्याला सत्तेत संधी या नियमानेच ही निवड होईल, असे सदस्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...