Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात काल 315 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात काल 315 करोनाबाधित रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 315 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 276 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

- Advertisement -

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 40 खासगी रुग्णालयात 252 तर अँटीजन चाचणीत 23 रग्ण आढळून आले आहेत. तर 276 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-08, ममदापूर-03, पिंपरी निर्मळ-07, एकरुखे-03, रांजणगाव-09, दाढ बुद्रुक-05, दुर्गा्पूर-02, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-27, लोणी खुर्द-12, डोर्‍हाळे-03, कनकुरी-03, नांदुर्खी खुर्द-03, केलवड बुद्रुक-09, केलवड खुर्द-01, साकुरी-04, आडगाव बुदु्रक – 03, कोल्हार-16,भगवतीपूर-04, बाभळेश्वर बुद्रुक-08, पाथरे-03, हनुमंतगाव-11, लोहगाव-01, सावळीविहिरी बुदु्रक-09, निमगाव-05, निघोज-04, रुई-02, पिंपळवाडी-08, वाकडी-13, जळगाव-01, धनगरवाडी-02, चितळी-24, पुणतांबा-16, रांजणखोल-09, रामपूरवाडी-06 नपावाडी-05 असे 250 शिर्डी-40, राहाता-15, बाहेरील तालुक्यातील 10 असे एकूण 315 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या पाच ते सहा दिवसापासून शिर्डी शहरातील करोनाबाधितांना दिलासा मिळाला होता. मात्र काल पुन्हा 40 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. तसे लोणी बुद्रुकमध्ये 27, चितळी 24 तर कोल्हारमध्ये 16 असे रुग्ण आढळून आले आहेत. पुन्हा 315 चा आकडा राहाता तालुक्यात पोहोचला आहे. मात्र बरे होणार्‍यांचे प्रमाणही चांगले आढळून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या