Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधराहाता तालुक्यात नवीन 38 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात नवीन 38 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल नव्याने 38 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 203 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24836 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24646 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00, खासगी रुग्णालयात 33 तर अँटीजेन चाचणीत 05 असे एकूण 38 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-01, लोणी बुद्रुक-04, गोगलगाव-01, लोणी खुर्द-05, पिंपळस-02, आडगाव बुदु्रक-01, हनुमंतगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-06, वाकडी-03 असे 28 तर शहरी शिर्डी-06, राहाता-03 व अन्य-01 असे सर्व एकूण 38 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या