राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता (Rahata) तालुक्यातील साकुरी (Sakuri) येथे डूक्करांना अफ्रिकन स्वाईन फिवरची (African Swine Fever) लागण झाली असल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने एक किमीच्या परिघातील डूकरांना (Pigs) कलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपुर्वी दोन डूक्करे (Pigs) आजारी होती. त्यात ते दगावले. पशुवैद्यक डॉ. कोळपे व डॉ. तांबे यांनी त्यांचे शविविच्छेदन करुन काही सँपल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या तपासणीत या डुक्करांना अफ्रिकन स्वाईन फिवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्हा स्तरावर हे रिपोर्ट आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी यांनी साकुरीच्या 1 किमी परिघात डुक्करे असतील त्यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर (Ahilyanagar) येथून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पाटील, सहाय्यक उपायुक्त डॉ. राजळे व डॉ. दिघे यांचे पथक साकुरीत दाखल झाले. राहाता (Rahata) येथील सहाय्यक उपायुक्त डॉ. संपत तांबे व त्यांच्या टिमने साकुरी (Sakuri) येथे जावून दोन दिवसात 12 डूक्करांचे कलिंग (शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट) केले. अजूनही तीन ते चार डुकरे शिल्लक असल्याने आज सोमवारीही ही मोहिम सुरु राहील.
साकुरी (Sakuri) ग्रामपंचायतीने आवश्यक तेथे फवारणी केली असल्याचे सरपंच मेघना संदिप दंडवते यांनी सांगितले. जिल्हा प्रशासानच्या सुचनेनुसार ग्रामपंचायत मार्फत आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी (Drug Spray) करण्यात येईल, असे सरपंच सौ. दंडवते यांनी सांगितले.
अफ्रिकन स्वाईन फिवर हा माणसांना अथवा इतर जनावरांना होत नाही. त्यामुळे माणसांनी घाबरुन जावू नये. डुकरातून डुकरांना पसरणारा हा आजार आहे. ग्रामपंचायतीने आवश्यक तेथे फवारणी सुरु केली आहे.
– डॉ. संपत तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन राहाता





