मुंबई । Mumbai
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून एक है तो सेफ हे असा नारा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभांमध्ये सातत्याने ‘एक है तो सेफ हैं’ यावर जोर दिला आणि काँग्रेसवर जातींमध्ये भांडण लावण्यात येत असल्याचा आरोप केला. या आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. तसंच धारावीला या सर्वांमुळे फटका बसणार आहे असं राहुल गांधी म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ‘एक है तो सेफ है’ची तिजोरीच आणली. राहुल गांधी यांनी तिजोरीमधून दोन पोस्टर काढली. यामधील एका पोस्टवर नरेंद्र मोदी आणि अदानी हे दोघे दिसले. राहुल गांधी यांनी काढलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये पोस्टमध्ये धारावी दाखवण्यात आली. एकाच व्यक्तीला धारावी दिले जातंय, एकाच व्यक्तीला विमानतळ दिले जातंय, त्याच व्यक्तीला सर्वकाही दिले जातंय, असे राहुल गांधी यांनी म्हटले. हे नरेंद्र मोदी यांच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नसल्याचेही थेट म्हटले.
रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि महायुतीवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, भाजप या निवडणुकीत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. महाआघाडी सरकारच्या काळात अनेक मोठे प्रकल्प होणार असल्याचे ते सांगत आहेत. इथून ते बाहेरगावी गेले आहेत, पण त्यांच्या काळात ७ प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. येथील तरुणांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे. त्यांना नोकऱ्यांबद्दल बोलायचे नाही. याचा विचार महाराष्ट्रातील तरुणांना करावा लागेल. असाही ते म्हणाले.