Tuesday, November 26, 2024
HomeराजकीयRahul Gandhi : जातीनिहाय जणगणना होणारच अन् ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार;...

Rahul Gandhi : जातीनिहाय जणगणना होणारच अन् ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार; संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधींचं मोठं विधान

नागपूर । Nagpur

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा नारळ फुटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनना आणि आरक्षणाच्या मुद्याला हवा दिली आहे. ते नागपूर येथील संविधान सन्मान संमेलनात बोलत होते. तसेच यावेळी राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार घणाघात केला.

- Advertisement -

राहुल गांधी बोलताना म्हणाले, भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील नागरिकांच्या अधिकारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपल्याला याची रक्षा करायची आहे असंही ते म्हणाले आहेत.

तसंच, आरएसएस समोरून संविधानावर हल्ला करत नाहीत. कारण ते समोरच्या लढाईला भितात. ते वेगवेगळ्या माध्यमातून हल्ला करतात. त्यामध्ये विकास, प्रगती, देशहीत असे शब्द वापरून हल्ले करतात. परंतु, त्यांच्यामध्ये धमक नाही की समोर येऊन वार करण्याचे. जर येत असतील तर आम्ही तयार आहोत या असं म्हणायला असही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एक इकॉनॉमिस्ट आहेत जे असमानतेवर काम करतात, त्यांनी मला प्रेझेंटेशन देऊन सांगितलं की, भारतात जगातील सर्वात जास्त असमानता आहे. पण त्यांनी प्रझेंटेशनमध्ये जात शब्दाचा उल्लेख केला नाही. जेथून असमानता येत आहे त्याच्यावर त्यांनी चर्चाच केली नाही. काहीजण जात नाही म्हणतात, कारण त्यांना दिसत नाही. त्यांना दिसणारच नाही. जात दिसायची असेल तर ती खरंच पाहावी लागेल. दलित, पीडितांना रोज दिसते. जातीनिहाय जनगणनेतून सर्व स्पष्ट होईल. लोक जाती जनगणना संदर्भात चर्चा करत आहेत, तुम्ही कितीही चर्चा करा.. जातीनियाय जनगणना झाल्याशिवाय राहणार नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

तसेच, जातीनिहाय जनगणना केल्याने संविधान वाचेल. देशाला सांगायचा आहे गरिबांसोबत रोज अन्याय होत आहे. ९० टक्के गरिबांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात आपण लढत आहोत. यासाठी पहिली दोन कामे करणे आवश्यक आहे, एक जातीनिहाय जनगणना आणि दुसरे ५० टक्क्यांची भींत असेही राहुल गांधी म्हणाले. जेव्हा जातीनिहाय जनगणनेविषयी आम्ही बोलतो तेव्हा राहुल गांधी देशाचे तुकडे करण्याचे काम करत आहे असा आरोप मोदी करतात. मी लोकांना सांगतोय की देशातील ९० टक्के लोक या देशाच्या विकासात सहभागी झालेले नाहीत. कॉर्पोरेट भारत, न्यायव्यवस्थेत ९० टक्के लोक नाहीत. जर तुम्हाला आदीवासी, दलीत पाहायचे असतील तर ते जेल, मनरेगाच्या रांगेत दिसतात असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या