Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकRahul Gandhi : नाशिकमधील अग्निवीरांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल; म्हणाले,...

Rahul Gandhi : नाशिकमधील अग्निवीरांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल; म्हणाले, “असा भेदभाव…”

मुंबई | Mumbai

दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये (Deolali Camp) प्रशिक्षण सुरू असताना तोफेचा बॉम्बगोळा फुटून झालेल्या स्फोटात (Explosion) दोन अग्निवीरांचा (Fire Fighters) मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली होती. गोहिल विश्वराज सिंग (वय २०) आणि सैफत शीत (वय २१) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही अग्निवीरांची नावे आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दोघांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut on Baba Siddique : “गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत फडणवीसांवर संतापले

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “नाशिकमध्ये (Nashik) प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत यांचं निधन वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे असून त्यांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करतो. या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याचे उत्तर भाजपला (BJP) देता येत नसून सरकार अपयशी ठरले आहे”. असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Baba Siddique Death : आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; आज न्यायालयात नेमकं काय घडलं?

तसेच पुढे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “गोहिल आणि सैफ यांच्या कुटुंबीयांना (Family) वेळेवर नुकसान भरपाई मिळेल का, जी इतर कोणत्याही जवानाच्या हौतात्म्याइतकी आहे? अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जेव्हा दोघेही सैनिकांची जबाबदारी आणि बलिदान समान आहे, मग त्यांच्या हौतात्म्यानंतर हा भेदभाव का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या तोंडावर ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रकाशित; महायुतीवर टीकेची झोड

पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये “अग्निपथ योजना लष्करासोबत अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का, याचं पंतप्रधान (PM) आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांना घेरले आहे. तसेच या अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहू या. भाजप सरकारची अग्निवीर योजना हटवण्यासाठी आणि देशातील तरुण आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच आमच्या जय जवान आंदोलनात सामील व्हा,असे आवाहनही राहुल गांधींनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...