Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'त्या' प्रकरणात उद्धव ठाकरे, संजय राऊतांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड

‘त्या’ प्रकरणात उद्धव ठाकरे, संजय राऊतांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड

मुंबई । Mumbai

मुंबईच्या सत्र न्यायालयाने (Mumbai Court) गुरुवारी शिवसेनाप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या बदनामीच्या प्रकरणात (Defamation case) न्यायालयाने हा दंड सुनावला असून रक्कम शेवाळे यांना दहा दिवसांत देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने विलंब माफीसाठी दोघांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र त्याचवेळी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

हा अर्ज स्वीकारताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे म्हणाले, विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. याचिकाकर्त्यांशी स्पर्धा करणारा कोणताही बचाव मुद्दाम केलेला नाही, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या