Tuesday, February 3, 2026
HomeनगरRahuri : राहुरी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप यादी जाहीर

Rahuri : राहुरी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप यादी जाहीर

अंतिम मतदार यादी 14 मार्चला प्रसिद्ध होणार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

233 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदास यादी मंगळवार, 6 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून अंतिम मतदार यादी 14 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. अमित पवार यांनी दिली.

- Advertisement -

या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत 24 जानेवारी पर्यंत राहणार आहे. त्यानंतर आवश्यक चौकशी व प्रक्रिया पूर्ण करून 7 फेब्रुवारीपासून अंतिम यादी प्रसिद्धीची कार्यवाही सुरू होऊन 14 मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 1 जानेवारी 2026 रोजी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा पात्र नागरिकांनी या कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक 6, नाव वगळण्यासाठी फॉर्म 7, दुरुस्तीसाठी फॉर्म 8 सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player

त्याचप्रमाणे स्थलांतर, दुबार नावे कमी करणे, मतदार यादीतील नोंदी व ओळखपत्रावरील छायाचित्र दुरुस्ती, तसेच एकाच मतदारसंघातील एका यादी भागातून दुसर्‍या यादी भागात नाव स्थलांतरित करण्यासाठीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
सदर अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करता येणार असल्याची माहिती डॉ. अमित पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Mira Bhayandar Election : मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर; मराठी एकीकरण समिती आक्रमक

0
मुंबई । Mumbai मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर आज या पेचावर पडदा पडला असून भारतीय जनता पक्षाच्या डिंपल...