राहुरी | प्रतिनिधी
राहुरी खुर्द येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व राहुरी पोलीस ठाण्यातील पथकाने सयुंक्त कारवाई करून 3 पिडीत महिलांची सुटका केली आहे. तसेच वेश्या व्यवसाय करून घेणार्या दोन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत राहुरी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हददीतील राहुरी खुर्द या गावामध्ये हॉटेल न्यु भरत यामध्ये वेशा व्यवसाय सुरू आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पो.ना. विकास साळवे, स.फौ. एकनाथ आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेच पो.स.ई तुषार धाकराव, पो.ना. संदिप दरंदले, म.पो.का. सारिका नारायण दरेकर, सायबर पोलीस स्टेशनचे पो.कॉ.रंजित जाधव, पो.ना.राजेंद्र खैरे, पो.कॉ. विशाल तनपुरे यांचे पथकाने राहुरी खुर्द येथील हॉटेल न्यु भरत येथे छापा टाकुन वेशा व्यवसाय करुन घेणारे आरोपी विक्रम सुरेश विशनानी (वय. 27) व फराद अहमदन सय्यद (वय 38) यांना अटक केली असून 3 पिडीत महिलांची सुटका केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर बसवराज शिवपुंजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांनी केलेली आहे.