Saturday, May 24, 2025
HomeनगरRahuri : राहुरी फॅक्टरी येथे आगीत तीन दुकाने जळून खाक

Rahuri : राहुरी फॅक्टरी येथे आगीत तीन दुकाने जळून खाक

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

- Advertisement -

राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील किराणा दुकान, ब्युटी पार्लर व कपड्याचे दुकान ही तिन्ही दुकाने शॉर्टसर्किटमुळे लागल्या आगी भक्षस्यानी पडली. अचानक लागलेल्या आगी मुळे तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवार 24 मे रोजी दुपारी सुमारे एक ते दिड वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात नितीन पुंड यांचे किराणा दुकान आहे. प्रीती साळवे यांचे ब्युटी पार्लरचे दुकान व सारिका कांगळे यांचे कपड्याचे दुकान आहे. दुपारच्या दरम्यान अचानक नितीन पुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या आगीने मोठा पेट घेतला. शेजारीच असलेल्या ब्युटी पार्लर व कपड्याच्या दुकानालाही त्याआगीने विळखा घालतल्याने मोठ्याप्रमाणात आगीने उग्र रुप धारण केले होते.

बघता बघता क्षणात होत्याचे नव्हते झाले. दुकानातील सर्व माल आगीच्या जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्नीनिशामक दलाच्या प्रयत्ना नंतर ही आग आटोक्यात आली. तो पर्यंत उशीर झाला होता. आगीत तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले.आग विझवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिका अग्निशामक विभाग व परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai भाजपचे शीर्षस्थ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज, रविवारपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर, नांदेड आणि मुंबई...