Thursday, April 3, 2025
Homeनगरराहुरीच्या माव्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो, मात्र स्थानिक प्रशासनाला वास येत नाही

राहुरीच्या माव्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो, मात्र स्थानिक प्रशासनाला वास येत नाही

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरात अनेक ठिकाणी तर तालुक्यातील ग्रामिण भागात निर्जनस्थळी सुगंधी मावा तयार करण्याचे उद्योग सुरू आहेत. या सुगंधी माव्याचा गंध तालुक्यात व तालुक्याच्या बाहेरही दरवळत असताना मात्र, राहुरीतील प्रशासनाला याचा वास येत नसल्याची चर्चा राहुरीकरांमध्ये होत आहे. राहुरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बंदी असलेल्या सुगंधी माव्याची बिनधास्त विक्री सुरू आहे. हा मावा बनविण्यासाठी शहरातील काही ठिकाणी व ग्रामिण भागात निर्जनस्थळी घरगुती मशिनरी आणून उद्योग उभे केले आहेत.

- Advertisement -

तालुक्याच्या ग्रामीण भागात हा मावा वेगळ्या नावाने ओळखला जातो. हा मावा सुनीता, तारा, बसस्टँड, चौक किंवा कॉर्नर अशा नावांनी तालुक्यात विकला जातो. तशा आशयाचे फलक ग्रामिण भागात सर्रास दिसत आहेत. कमी श्रमात व कमी वेळेत पैसे कमावणारा हा धंदा झाल्याने या व्यवसायाकडे अनेक युवक वळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे सरकारने सुगंधी तंबाखू व गुटखाबंदी केल्याने गुटख्याला मावा हा पर्याय झाल्याने या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. शहरातील एका मावा किंगला दररोज काही पोते सुपारी लागते असेही समजते. यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू व इतर घातक सामुग्री सहजरित्या उपलब्ध होत आहे.

काही मावा बनविणारे ग्रामिण भागात किलोच्या दराने मावा विक्रीसाठी पोहच करीत असतात. सहज मिळत असल्याने महाविद्यालयीन तरुण व शाळकरी अल्पवयीन मुले या माव्याच्या विळख्यात सापडले आहेत. तसेच अनेकांना मुख कर्करोगा सारख्या व्याधीने ग्रासले आहे. तर काहींचे कर्करोगामुळे जीवन संपले आहे. सुरूवातीला हा मावा फक्त काही ठिकाणी चोरून विकला जात होता. मात्र आता हा मावा किराणा दुकान, चहा हॉटेल, टपर्‍या आदी ठिकाणी सहज मिळतो. शहरातील व तालुक्यातील या सुगंधी माव्याचे कारखाने त्वरीत बंद करावेत, अशी मागणी आता राहुरीकरांमधून होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका; टॅरिफमध्ये २६...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासह जगभरातील देशांवर आयात कर (Import Tax) लागू केला आहे. सर्व...