Tuesday, February 3, 2026
HomeनगरRahuri : राहुरी नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ

Rahuri : राहुरी नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ

मतदार यादीत प्रभागांची अदलाबदल, संभाव्य उमेदवारांची धावपळ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झालेली असून या यादीत अनेक घोळ आहेत. जे मतदार अनेक वर्षे ज्या प्रभागातून कायमचे मतदान करतात किंवा त्या प्रभागातील कायमचे रहिवासी असतात, त्यांची नावे दुसर्‍या प्रभागात गेल्यामुळे त्या मतदारांची आणि संबंधित संभाव्य उमेदवाराची धावपळ सुरू आहे. अशा नावांवर हरकत घेण्यासाठी आज 13 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे.

- Advertisement -

प्रभागातील मतदारांची नावे दुसरीकडे गेलीच कशी? ती कोणी अन्यत्र हलविली? त्यास जबाबदार कोण? शहरातील प्रभाग 5 मधील एक नाही, दोन नाही, तर चक्क 400 ते 500 मतदारांची नावे प्रभाग 4, प्रभाग 6 आणि प्रभाग 12 मध्ये समाविष्ट झाली आहेत. राहुरी शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नवीन प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये समाविष्ट केलेली आहेत. प्रभाग क्रमांक 5 (संत सावता महाराज) या प्रभागातील वैजनाथ मंदिर, शिवाजी चौक, विद्या मंदिर परिसर, मठ गल्ली, जंगम गल्ली तसेच शिवाजी चौक, लोहार गल्ली, रामबुवा मंदिर परिसर या भागातील मतदारांची नावे इतर प्रभाग 4, प्रभाग 6 आणि प्रभाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

YouTube video player

प्रभाग 5 मधील अन्य प्रभागात समाविष्ट झालेले मतदार बहुतेक मतदारांचे वास्तव्य जर वर्षानुवर्षे त्याच प्रभागात असताना, यावेळी त्यांची नावे प्रभाग 4, प्रभाग 6 आणि प्रभाग 12 मध्ये कोणत्या आधारावर समाविष्ट केली गेली? शासनाने प्रभाग रचना करताना वरील सर्व नावे शासनाने जाहीर केलेल्या प्रभागात राहत असताना, काही नावे अन्य ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात; पण एकाच वेळी प्रभाग 5 मधील जवळपास 700 मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात कोणत्या आधारे समाविष्ट केली गेली, यास जबाबदार कोण? वास्तवात देशात मतदार यादीचा घोळ उघडकीस आल्यावरही स्थानिक संस्था निवडणुकीत हा घोळ जाणूनबुजून कोणी केला याचे उत्तर शासनाला द्यावे लागेल.

शासनाने राहुरी नगरपालिकेची प्रभाग रचना करताना, वरील अन्य प्रभागात समाविष्ट झालेले मतदार जर त्या प्रभागात 5 मधील रहिवाशी असल्याचा पुरावा असूनही त्यांना अन्य प्रभागात का समाविष्ट केले गेले? अशाच प्रकारे शहरातील अन्य प्रभागातही असे प्रमाण कमी-जास्त आहे; मात्र हा अन्याय प्रभाग 5 मधील मतदारांवरच झाला आहे, याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी मतदारांकडून होत आहे. ज्या मतदारांची नावे अन्य प्रभागात समाविष्ट झाली आहेत, त्यांनी आपल्या मतदार यादीतील नावे खात्री करून घ्यावीत. जर इतर प्रभागात नाव समाविष्ट झालेले असेल, तर त्यासाठी नवीन दुरुस्ती फॉर्म 13 तारखेपर्यंत भरून द्यावा लागेल.

ताज्या बातम्या

Nashik NCP Politics : राष्ट्रवादीत गटनेतापदावर ‘या’ नगरसेविकेने दावा सांगितला ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात गटनेतापदावरून तीव्र अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी नगरसेविका डॉ....