अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अनेक भागात खरीप हंगाम पिकांची वाट लागलेली असतांना आता राहुरी, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील 30 हून अधिक शेतकर्यांना कापूस उत्पादक कंपन्यांकडून सदोष बियाणे विक्री केले असल्याची तक्रार कृषी विभागाकडे आलेली आहे.
दरम्यान कापूस उत्पादक शेतकर्यांकडून आलेल्या तक्रारीनुसार कृषी विभागाने संबंधित कपाशी बियाण्यांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये कृषी विभागाचे अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची मदत घेत असून येत्या 15 ते 20 दिवसात संबंधीत कपाशी बियाण्याची चौकशी पूर्ण करून यात दोषी आढळणार्यासंबंधित कंपन्यांविरुद्धकारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात राहुरी, नेवासा आणि संगमनेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते. यंदा देखील जिल्ह्यात अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड झाली होती. मात्र मान्सूनपूर्व पावसासह ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी सततच्या पावसामुळे कपाशी पिकाला फटका बसला.
दुसरीकडे शेतकर्यांच्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने यांना त्पादक शेतकर्यांचे हाल होताना दिसत आहेत. त्यातच जिल्ह्यात राहुरी, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील 30 हून अधिक शेतकर्यांनी कपाशी बियाणांबद्दल कृषी विभागाकडे तक्रार आलेल्या आहेत. या तक्रारीत बोंडसड, कपाशीचे बोंडे गळून जाणे यांचा समावेश असून कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार संबंधित शेतकर्याच्या पिकाची विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ यांच्यासह स्थळ पाहणी सुरू आहे. यात संबंधित कंपनीच्या बियाण्यांची तपासणी आणि पिकांची स्थिती याची पाहणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाचे सूत्रांकडून सांगण्यात आले. येत्या 15 ते 20 दिवसात हे तपासणी पूर्ण होऊन कृषी विभागाने कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तक्रारी असणार्या कपाशी बियाणे कंपनी दोष आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारणार असल्याचे सांगण्यात आले.
तरच ग्राहक मंचात दात मागता येणार
कृषी विभागाने सदोष कपाशी बियाणे प्रकरणी चौकशी करून त्यात दोष आढळल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित शेतकर्यांना देण्यात येणार आहे. या अहवालावर बाधित शेतकर्यांना संबंधित कंपनीचे विरोधात ग्राहक मंचामध्ये दाद मागता येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.




