Tuesday, March 25, 2025
HomeनगरRahuri News: पतंग उडवताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

Rahuri News: पतंग उडवताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

आरडगाव (वार्ताहर)

राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात एका १२ वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहीरीत पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. १० जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. याच कुटुंबातील बिनीता बिष्णू थापा ही १२ वर्षाची मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज दि. १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहीरीत पडली. आणि पाण्यात बुडू लागली.

तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहीरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहीरीतून बाहेर काढण्यात आले.

रुग्णवाहिका चालकांनी तीला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी मयत बिनीता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...