Friday, October 11, 2024
Homeनगरराहुरी स्टेशन येथील घरावर हल्ला; चारचाकी वाहनांची तोडफोड

राहुरी स्टेशन येथील घरावर हल्ला; चारचाकी वाहनांची तोडफोड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील राहुरी स्टेशन येथे काही समाजकंटकांच्या टोळक्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पत्रकाराच्या घरावर हल्ला करत घरासमोर असलेली चारचाकी वाहनांची तोडफोड करत पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी, शनिवार 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजे दरम्यान तीन मोटरसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात सात जणांच्या टोळक्याने सय्यद यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी टोळक्याने घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. तसेच दोन चारचाकी वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट्रोल फुगे घरात टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी पत्रकार निसार सय्यद यांच्या कुटुंबातील एका तरूणावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारीत केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनेचा संबंध आहे काय? याचा तपास पोलीस करत आहेत.

निसार मगबूल सय्यद, रा. रेल्वे स्टेशन, तांदुळवाडी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात सात जणांवर गुन्हा रजि. नं. 887/2023 भादंवि कलम 436, 427, 143, 37 (1), 37 (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या