Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठा निर्णय! रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद, कारण काय?

मोठा निर्णय! रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद, कारण काय?

रायगड । Raigad

आज ८ जुलैपासून रायगड किल्ला (Raigad Fort) पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने रायकड किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवे ने गडावरुन उतरवण्यात येत आहे. यानंतर रोप वे देखील प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Raigad Fort Closed)

हे देखील वाचा :  मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर

रायगडम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत.

आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. दरम्यान, अनेक पर्यटक या पाण्याच्या लोंढात अडकले असून आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरून वाट काढत आहेत.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या