Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशTrain Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात! पॅसेंजर आणि मालगाडीची समोरासमोर भीषण धडक;...

Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात! पॅसेंजर आणि मालगाडीची समोरासमोर भीषण धडक; ६ जणांचा मृत्यू

छत्तीसगड | Chhatisgadh
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका मोठा रेल्वे अपघात घडलाय. मंगळवारी संध्याकाळी जयराम नगर स्टेशनजवळ गेवरा रोड बिलासपूर (6873) मेमू लोकल ट्रेन आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झालीय.

या अपघातात ६ पवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे तर अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखम झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. ही टक्कर इतकी भीषण होती की यामध्ये अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही डबे मालगाडीवर चढले. अनेक मालगाडीच्या डब्यांचेही रुळावरून घसरण झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलासपूर-कटनी विभागात लाल खंड परिसराजवळ कोरबा पॅसेंजर ट्रेन एका थांबलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात मालगाडीचे काही डबे रुळावरुन घसरले तर काही पॅसेंजरचे डबे मालगाडीवर चढले ज्यामुळे ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टीमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामुळे मार्गावरील रेल्वे ऑपरेशन विस्कळीत झाले. रेल्वे बचाव पथके, आरपीएफ कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पोहोचले. आपत्कालीन वैद्यकीय पथके देखील जखमींवर उपचार करत आहेत.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...