Wednesday, July 24, 2024
Homeजळगावरेल्वे मंडळ अभियंता, ओएस एसीबीच्या जाळ्यात

रेल्वे मंडळ अभियंता, ओएस एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ – Bhusawal

- Advertisement -

भुसावळ डीआरएम कार्यालयातील (Bhusawal DRM Office) मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

तब्बल 18 जणांच्या पथकाने सोमवार दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील अधिकार्‍यांच्या दालनातच लाच घेताना अधिकार्‍यांना अटक केल्याने लाचखोरा अधिकार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डीआरएम कार्यालयातील दालनातच स्वीकारली लाच

नागपूरचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले (S.R. Chowgule) व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदाराने नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती. लाचेची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा यशस्वी करण्यात आला. दरम्यान, दोघा अधिकार्‍यांच्या घराची या पथकाकडून सुरू असून त्यात काय सापडले याबाबत माहिती कळू शकली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या