Sunday, May 19, 2024
Homeजळगावखा.उन्मेश पाटील यांचेसह रेल्वे अधिकारी करणार भादली रेल्वे अंडर बायपास स्थळाचे निरीक्षण

खा.उन्मेश पाटील यांचेसह रेल्वे अधिकारी करणार भादली रेल्वे अंडर बायपास स्थळाचे निरीक्षण

नशिराबाद, ता.जळगाव (वार्ताहर) – nashirabad

रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वे विभागाने नशिराबाद जवळील भादली रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद केले. सदर गेट बंद झाल्याने शेतकरी, नागरीकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सदर ठिकाणी रेल्वे अंडर बायपास मंजूर असून त्या कामाला गती मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आठ-नऊ कि.मी.फेऱ्याने जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील व त्यांचे सहकारी, शेतकरी यांनी यापुर्वीही खा.उन्मेश पाटील यांची भेट घेऊन रेल्वे गेटची समस्या सोडविण्यासाठी विनंती केली होती. यावेळी खा.पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सदर काम मार्गी लागत नसल्याने जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी खा.उन्मेश पाटील यांची आज दि.८ ऑक्टोंबर रोजी भेट घेतली.

- Advertisement -

अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे खा.उमेश पाटील व नशिराबाद गावातील लोकप्रतिनिधींची भादली रेल्वे गेट संदर्भात बैठक झाली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या समजून घेत रेल्वे गेटचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी खा.उन्मेश पाटील यांनी रेल्वेच्या अधिकारी पंकज धावारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून प्रलंबित असलेल्या रेल्वे अंडर बायपासच्या कामासंदर्भात प्रत्यक्ष जागेवर स्वतः खा.उन्मेश पाटील, रेल्वेचे अधिकारी व संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांना सोमवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजेला स्थळ निरीक्षण करण्यासाठी येण्याबद्दल सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांना बोलावून दाखवण्यासाठी खा.उन्मेश पाटील स्वत: येणार असल्याची माहिती लालचंद पाटील यांनी दिली. या बैठकीला मा.जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, योगेश पाटील, भादली गावाचे सरपंच मिलिंद चौधरी, परेश वाघुळदे, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या