Saturday, July 27, 2024
Homeनगररेल्वे पोलिसाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफला पाचारण

रेल्वे पोलिसाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफला पाचारण

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

रुई चोंडा येतील धबधबा परिसरात रेल्वे पोलीस पाण्याच्या भोवर्‍यात सापडून डोहामध्ये अडकला आहे.

- Advertisement -

त्याचा शोध सुरू आहे, मात्र शोध घेण्यास येथील पथकास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. पुण्यावरून ही एनडीआरएफची टीम येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

रेल्वे पोलीस फोटो काढत असताना डोहात पडला आहे. त्याच्यासोबत पोलीस फोटो काढत होता त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. नगरवरून आलेल्या आपत्कालीन वाहनाने अनेकवेळा गळ टाकला मात्र शोध लागला नाही. हा डोह जवळपास 70 फूट खोल असल्याची माहिती समजली.

पारनेर तालुक्यातील नुकताच प्रसिद्ध झालेल्या रुई चोंडा धबधब्यावर रेल्वेचे 4 पोलीस दि.24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास आले होते. तेथे फोटो काढत असताना एक पोलीस अचानक डोहामध्ये फसला गेला त्याच्या सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली.

त्याला शोधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली तसेच पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांच्यासह पोलीसही घटनास्थळी दाखल झाले तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील घटनास्थळी जात शोध मोहिमेस गती दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.बडदे व अग्निशमन अधिकारी मिसाळ यांच्या मार्गदरशनाप्रमाणे प्रशासनाने अथक प्रयत्न केला. मात्र शोध लागत नसल्याने अखेर पुण्यावरून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले 5 वाजेपर्यंत हे पथक येथे पोहचेल, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

त्याचबरोबर पारनेर पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे पथकासह शोधाशोध घेत आहेत. रेल्वे पोलीसांचे पथक शोध घेण्यासाठी आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र त्यात यश आले नाही. कदाचित डोह खोल असल्याने त्याच्या कुठेतरी कपारीला या पोलिसाचा मृतदेह अडकला असण्याची शक्यता आहे त्यामुळे शोधास अडचणी येत आहेत. एनडीआरएफची टीम आल्यानंतर शोध मोहिमेला गती येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या