Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रWeather Updates : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशातून मान्सून पूर्णत: परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिके काढणीला आली आल्याने शेतीकामाला वेग आला आहे. अशातच हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मुसळधार पाऊस होईल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह ठाण्यातील तापमानात वाढ कायम आहे. पुण्यात सकाळी गारवा, तर दुपारी उन्हाच्या झळा बसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या