Friday, November 22, 2024
Homeनाशिकदिंडोरी शहरासह तालुक्यात पावसाची तूफानी हजेरी!

दिंडोरी शहरासह तालुक्यात पावसाची तूफानी हजेरी!

दिंडोरी । प्रतिनिधी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल होवून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी विजेच्या कडाकाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

यावेळी दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळे जवळ झाड रस्त्यावर पडून काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर नागरिकांनी झाड बाजूला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली. तसेच खतवड येथे एक तास पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. तथापि काल मृग नक्षत्रास प्रारंभ होत असल्याने वातावरणात बदल होवून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सुर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरासह खतवड, आंबेदिंडोरी, तळेगाव दिंडोरी, जानोरी, जऊळके, खेडगाव, बोपेगाव, पालखेड बं., वलखेड, निळवंडी, पाडे, मडकीजांब, वनारवाडी, ननाशी या भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात वाळवाचा एकही मोठा पाऊस झाला नसल्याने दुष्काळी भागातील पाणी प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. शेतकर्‍यांनी शेतात ठेवलेल्या कांदा पीक व इतर पिके झाकण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली.

तसेच वादळी वार्‍याने दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळे शिवारात रस्त्यावर झाड पडून वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. तसेच खतवड येथे साधारण एक तास पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचले होते. विजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे दिंडोरी शहरासह काही गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या