Friday, December 13, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल

Nashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल

नाशिक | Nashik

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरात (Nashik City) सकाळच्या सुमारास ऊन तर दुपारच्या सुमारास पाऊस (Rain) हजेरी लावत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह (School Students) नागरिकांचे हाल होतांना दिसत असून सध्या शहरात ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

काल मंगळवार (दि.२७) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील काही भागांत पावसाने तुफान हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली होती. यानंतर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक नागरिक (citizens) ओलेचिंब झाल्याचे दिसून आले.

पहिल्या दिवशी एटीएममध्ये चोरीचा डाव फसला, दुसऱ्या दिवशी मात्र चोरांनी तेच एटीएम फोडले

दरम्यान, आज सकाळी नाशिक शहरात काही भागांत ढगाळ वातावरण (Cloudy weather) तर काही भागांत नऊ ते दहा वाजेच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवत होते. त्यानंतरअकरा वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील विविध परिसरात पावसाने तुफान हजेरी लावली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर (Road) आणि गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या