Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई | Mumbai

गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दडी मारली आहे. परंतु कालपासून मुंबई आणि उपनगरांच्या भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर १ सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून विदर्भात मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आल्यानं विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली होती.

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता हवामान खात्यानं विदर्भात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्यानं चिंता वाढल्या आहे.

जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या