Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज...

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय, वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली असून शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पुन्हा एकदा आगमन कधी होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच आता पावसाबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून या महिन्याच्या शेवटी पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा तर उर्वरित ठिकाणी ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

खबरदार! वाहतूक नियम भंग कराल तर…; आता शहरावर ‘इतक्या’ सीसीटीव्हींची नजर

तसेच नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा सुरु राहणार आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) १८ ते २४ ऑगस्ट या काळात पुन्हा महाराष्ट्रात (Maharashtra) पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर आज राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

देशदूत विशेष : सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ४५ गावांमध्ये आता ‘स्मार्ट व्हिलेज’

- Advertisment -

ताज्या बातम्या