Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रशालेय पोषण आहारात बेदाणा - फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती

शालेय पोषण आहारात बेदाणा – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

शालेय पोषण आहारात (School nutrition Diet) आता यापुढे विद्यार्थ्यांना बेदाणा (Raisin) देण्यात येणार आहे, अशी माहिती फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आठवड्यातून किमान एक दिवस तरी विद्यार्थ्यांना बेदाणा मिळेल याची दखल घेण्यात येईल, असे सांगत यामुळे शेतकऱ्यांना एकप्रकारे मदत होणार असल्याचा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचे मोठे उत्पादन झाले असून त्याचे मोठ्या प्रमाणात बेदाणे बनवले गेले आहेत. गेल्यावर्षी बेदाण्याला २०० रूपये भाव होता, यंदा मात्र खूपच कमी भाव आहे. त्यामुळे जो बेदाणा आहे तो शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनवेळा बेदाणा देण्यात यावा तसेच शीत गृहात पडून असलेल्या बेदाण्यावर बँकांकडून आकारण्यात येणारे व्याज सरकारने भरावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती .

या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भूमरे म्हणाले, शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना बेदाणा आवठड्यातून निश्चितच एक दिवस देण्यात येईल. शालेय पोषण आहारात हा विषय आहे. बेदाणा शालेय पोषण आहारात दिला तर शेतकऱ्यांना भाव मिळण्यास मदत होईलच. तसेच शीतगृहात पडून असलेल्या बेदाण्यावरील व्याजाच्या भरपाईबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या