Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजफडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो ; राज ठाकरे...

फडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो ; राज ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई | Mumbai
बिझी लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खास मुलाखत झाली. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय. नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय. लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला आणि याचे उपचार वाढले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरे म्हणाले वजन कमी कसं करायचं कळले असते तर मीच वजन कमी केले नसते का? असा प्रश्न विचारत उपस्थितांना मिश्किल उत्तरे दिली.

- Advertisement -

सध्या मुलांमध्ये वाढलेल्या लठ्ठपणावर उत्तर देताना विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या मुलाखतीच्या एका प्रश्नाला फडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो, असे उत्तर दिले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

हे ही वाचा : Nashik Igatpuri News : मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

राज ठाकरे काय म्हणाले?
लहान मुलांच्या वाढत्या वजनाच्या समस्येवर राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “मला कळले असते, तर मीच वजन कमी नसते का केले? आमच्या सूनेच्या रुपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले, पण तेव्हापासून माझे वजन वाढायला लागले आहे.” राज ठाकरेंनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज ठाकरे म्हणाले, “देवेंद्रजी जे म्हणाले ती गोष्ट महत्त्वाची आहे. खेळ खेळले पाहिजेत. मी सकाळी टेनिस खेळतो, ४७० कॅलरीज बर्न होतात. मी योग्य मार्गावर आहे” असेही राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विशेष म्हणजे सरकारने प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून कॉन्सिलिंग करायची. देशात हा प्रोग्राम हातात घ्यायचं पूर्ण सुरु आहे. आता विशेषतः राज्य व केंद्र सरकारने पीटीचा तास अनिवार्य केले आहे. विना मैदानाची शाळा सुरु करता येणार नाही. अनेक मुलं मैदानात जात नाहीत, डिजिटल गेम खेळतात. त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरु झालीय. राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचं सहभाग वाढत आहे. पालकांना ही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या