Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; 'इतक्या' जागा लढवणार

राज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; ‘इतक्या’ जागा लढवणार

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीला महायुतीला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेला २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता महायुतीचे (Mahayuti) नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी ‘शिवतीर्थावर’ जातात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : “माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लिप जाहीर करा”; अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “आगामी निवडणुकीत आपल्या मनसेचे (MNS) लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत.काही लोक हसतील, पण हे घडणार म्हणजे घडणारच. आम्ही सगळेजण त्या तयारीला लागलो आहोत. मी तयार केलेल्या टीम पुन्हा आता प्रत्येक जिल्ह्यात येतील.ते तुमच्याकडील माहिती जाणून घेतील. त्यांना मतदारसंघातील मूळ परिस्थिती समजावून सांगा. काय गोष्टी होऊ शकतात, याचा विचार करा. मी पाठवलेल्या मनसेच्या पथकांना योग्य माहिती द्या, युती होईल का? आघाडी होईल का? असा काही विचार करू नका, विधानसभेला आपण २२५ ते २५० जागा लढवणार आहोत,” असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

तसेच “विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. तिकीट मिळाले की मी पैसे (Money) काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही. जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत, त्यांनी माहिती नीट द्या, तुमची माहिती चेक होणार आहे. त्यामुळे काय परिस्थितीत आहे. काय घडू शकते, याचे आकलन करा”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या